pm vishwakarma scheme
Pm Vishwakarma scheme
तर मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडीयम एंटरप्राइजेस यांच्यातर्फे हे जबरदस्त अपडेट आला आहे पीएम विश्वकर्मा योजनेबद्दल माहिती सांगतोय, पीएम विश्वकर्मा योजना 2024 ही योजना असंघटित कामगारांसाठी आहे, असंघटित कामगारांना एक लाख पर्यंतचे कर्ज दिले जाते ते पण 5% टक्के या दराने आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा 15 हजार रुपये सुद्धा दिले जाणार आहेत त्यामध्ये जे कोणी कामगार असतील ते व्यवसायासाठी लागणार जे काही किट असेल ते सुद्धा घेऊ शकतात.
पीएम विश्वकर्मा योजना की काय आहे?
हे कोणा कोणासाठी आहे? यासाठी कोण पात्र आहे? यासाठी कोण अर्ज करू शकतो? याचा ऑनलाइन जो फॉर्म आहे? तो कशा पद्धतीने भरायचा आहे? ए टू झेड प्रोसेस आपण या मध्ये पाहणार आहोत.
तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईट वरती यायचंय www.pmvishwkarma.gov.in या वेबसाईट वरती सर्व माहिती दिलेली आहे. इथे मी मराठीमध्ये माहिती तुम्हाला सांगतो.
तर पात्रता काय आहेत?
जे स्व-रोजगाराच्या आधारावरती असंघटित क्षेत्रात हात आणि साधनांनी काम करणारे, जे कोणी व्यक्ती असतील ते अर्ज करू शकतात. लाभार्थ्यांचे वय 18 वर्ष असणे गरजेचं आहे. ज्यांनी पीएमईजीपी, मुद्रा लोन वगैरे गेल्या पाच वर्षात घेतलं असेल, तर ते अर्ज करू शकत नाहीत. आणि जे काही सरकारी कुटुंब असतील, ते सुद्धा अर्ज करू शकत नाहीत. आता तुम्ही म्हणाल की असंघटित क्षेत्रात जे असंघटित कामगार आहेत,
कोणते ते लोहार, लॉक स्मिथ, शिल्पकार, मूर्तिकार दगडी आणि कोरीव काम करणारा कारागीर, दगड तोडणारा कारागीर आणि अवजारे बनवारी कारागीर इत्यादी प्रकारचे कारागीर या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्याच्यानंतर सोने चांदीवर आधारित व्यावसायिक म्हणजेच या ठिकाणी सोनार आणि सुवर्णकार हे सुद्धा कारागीर या योजनेचा लाभ हे घेऊ शकतात. त्याच्यानंतर कुंभार मोची, मच्छीमार,शिंपी, बडगर, माळी, गवंडी, कुलूप बनवणारे, विणकाम करणारे कामगार इत्यादी प्रकारच्या असंघटित कामगारांना पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ हा घेता येणार आहे हे सर्वजण इथे अर्ज करू शकतात.
तसेच योजनेचे फायदे नक्की काय आता यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार. पहिली ओळख भेटणार आहे, म्हणजे प्रमाणपत्र भेटले जाईल आणि विश्वकर्मावरून ओळख तुम्हाला भेटेल, तसेच कौशल्य आहे, म्हणजे ट्रेनिंग दिलं जातं. तुम्ही पाच ते सात दिवसाचा ट्रेनिंग करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट पंधरा दिवसाचं ट्रेनिंग घेऊ शकता. 15 दिवसाचा जर ट्रेनिंग केलं तर तुम्हाला रोज पाचशे रुपये दिले जातील आणि सगळ्यात महत्वाचा ट्रेनिंग कंप्लिट झाल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटेल आणि 15,000 तुम्हाला दिले जातील. ज्यामध्ये तुम्ही जे काही व्यवसाय साठी लागणारे टूलकीट आहे ते घेऊ शकता.
क्रेडिट सपोर्ट आहे म्हणजे एक लाख रुपये, एक लाख पर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता, 18 महिन्यांमध्ये तुम्हाला हे कर्ज फेडायचंय, जर तुम्ही हे फेडलं तर तुम्हाला आता दोन लाखाचं कर्ज सुद्धा मिळू शकते. पण अगोदर एक लाखाचे कर्ज फेडायला लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं खास व्याजदर किती आहे? तर 5% फक्त इथे व्याजदर आकारला जाणार आहे. आता जे डिजिटल व्यवहार करतात, आता व्यवसाय मध्ये तुम्ही जर गुगल पे, फोन पे वगैरे वापरत असाल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला एक रुपया दिला जाईल. जर तुम्हाला गुगल पे नी कोणी ट्रांजेक्शन केलं, पेमेंट केलं तर एक रुपया मिळेल.
अशा पद्धतीचे हे फायदे तुम्हाला या विश्वकर्मा योजनेमध्ये आहेत.आता अर्ज तुम्ही कुठे करू शकता?? तर शेजारील महा इ-सेवा केंद्र, सीएससी सेंटर, सेतु मध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे.
13000कोटी रुपयांची तरतूद केली गेलेली आहे. कधीपासून ही योजना सुरू झाली आहे तर 17 सप्टेंबर 2023 पासून योजना लॉन्च केली गेली आहे. विश्वकर्मा जयंती होती त्या दिवशीच अनाउन्समेंट केली गेली आणि लोक याचा फायदा घेता आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा कारण इंडियामध्ये त्यामुळे जेवढे आपले लोकांना समजेल तेवढेच जे फायदा घेतील तेवढी चांगली गोष्ट आहे .
या योजनेची पात्रता ही काय असणार आहे?
तर मित्रांनो,
1. भारतातील रहिवासी या योजनेचा लाभ हे घेऊ शकतात.
2. योजनेत विश्वकर्मा समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या 140 जातीतील व्यक्ती अर्ज करू शकतात.
3. भारतातील सर्व कारागीर पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणी करू शकतात.
4. Pm विश्वकर्मा योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक असावे लागते.
5. या योजनेअंतर्गत कुटुंबातील फक्त एकच सदस्य अर्ज करू शकतो म्हणजे तुमच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त एकाच व्यक्तीसाठी या योजनेचा ला भाग घेता येणार आहे.
6. कोणत्याही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या क्रेडिट आधारित योजनेचा लाभ घेणारे अर्जदार या योजनेसाठी पात्र नाहीयेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
चला जाणून घेऊया, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचे
आधार कार्ड ,पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, बँक पासबुक, पत्त्याचा पुरावा, मोबाईल नंबर, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज कलर फोटो इत्यादी कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत.
आशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत जर पात्र असाल तर या योजनेचा लाभ हे घेऊ शकतात. अनेक प्रकारचे लाभ तुम्हाला या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत. याविषयी मित्रांनो जर तुम्हाला काही शंका असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता तर भेटूया परत तोपर्यंत
नमस्कार……